Tap to Read ➤
PICS : पती जसप्रीत बुमराहच्या वाढदिवशी पत्नी संजना भावूक...!
भारतीय संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह आज त्याचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.
त्याची पत्नी संजना गणेशनने यानिमित्ताने काही फोटो शेअर केले.
संजनाने एक भावनिक मेसेज लिहला आहे.
"जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा यशाचे शिखर खूप छान वाटते आणि वाईट काळ इतका वाईट वाटत नाही", असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले.
तसेच हसण्यात, प्रत्येक अश्रूत, प्रत्येक आनंदात, प्रत्येक गोष्टीत, लहान असो वा मोठी, प्रत्येक गोष्टीत मी तुझी साथ द्यायला तयार आहे, असेही तिने म्हटले.
अलीकडेच बुमराह आणि संजना आई-बाबा झाले.
त्यांनी एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव अंगद ठेवले.
क्लिक करा