Tap to Read ➤
‘असा’एक देश, ज्याला महिलेचं नाव देण्यात आलंय!
महिलेचं नाव असलेला जगातला एकमेव देश कोणता?
सेंट लूसिया हा जगातला एकमेव देश असा आहे ज्याचं नाव महिलेच्या नावानं आहे.
एखाद्या देशाचे नाव अमुक का आहे असा प्रश्न आपल्याला काहीवेळा पडतो, पण आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतोच असे नाही.
मात्र सेंट लूसिया या देशाच्या नावाची स्टोरी अतिशय रंजक आहे, ती आपण समजून घ्यायला हवी.
सेंट लूसिया हा देश पूर्व कॅरिबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला आहे.
कॅस्ट्रीझ ही सेंट लूसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
लूसिया ही एक ख्रिश्चन संत होती आणि ती शहीद झाल्यानंतर या देशाला तिचे नाव देण्यात आले.
या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व इंग्लंडने १४ वेळा लढाया केल्या. अखेर १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला.
हा देश म्हणजे जगातील एकमेव ज्वलंत ज्वालामुखी आणि सल्फरची कारंजी असणारे ठिकाण आहे. याठिकाणी मारिया नावाचे सर्वात मोठे बेट आहे.
क्लिक करा