Tap to Read ➤

कसोटीत सर्वाधिक सेंच्युरीसह टॉप १० मध्ये असणारे  फलंदाज

आघाडीच्या १० फलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या बॅटरचा दबदबा
इंग्लंडचा बॅटर जो रुट याने पाकिस्तान विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील ३५ वे शतक झळकावले.
या खेळीसह इंग्लंडच्या फलंदाजाने लिटल मास्टर गावसकरांना मागे टाकले आहे. गावसकरांच्या खात्यात कसोटी कारकिर्दीत ३४ शतकांची नोंद आहे.
कसोटीत सर्वाधिक सामने खेळण्यासोबतच सर्वाधिक धावा आणि शतकांच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टॉपला आहे.
इथं एक नजर टाकुयात टेस्टमध्ये सर्वाधिक सेंच्युरी झळकवणाऱ्या आघाडीच्या १० फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर
श्रीलंकेचा फलंदाज महेला जयवर्धने याने १९९७ ते २०१४ या कालावधीत ३४ शतके झळकावली आहेत.
१९९० ते २००६ या कालावधीत वेस्ट इंडीज संघाचा मोठा आधार असलेल्या ब्रायन लाराच्या खात्यात ३४ कसोटी शतकांची नोंद आहे.
सुनील गावसकर  यांनी १९७१ ते १९८७ या कालावधीत ३४ कसोटी शतके झळकावली आहेत. नाबाद २३६ ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या आघाडीच्या १० फलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या एका खेळाडूचा समावेश आहे. युनूस खान याने २००० ते २०१७ या कालावधीत ३४ शतके झळकावली आहेत.
इंग्लंडचा जो रूट हा सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील एकमेव सक्रीय खेळाडू आहे. त्याच्या खात्यात आता ३५ शतके जमा झाली आहेत.
राहुल द्रविडनं १९९६ ते २०१२ या कालावधीत भारताकडून खेळताना ३६ कसोटी शतके झळकावली आहेत.
श्रीलंकेच्या कुमार संगकारानं २००० ते २०१५ या कालावधीत ३८ कसोटी शतके ठोकली आहेत.
ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंग याने १९९५ ते २०१२ या आपल्या कसोटी कारकिर्दीत ४१ शतके झळकावली आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने १९९५ ते २०१३ या कालावधीत ४५ शतके झळकावली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शतकांचे अर्धशतक पार करणारा एकमेव फलंदाज आहे. १९८९ ते २०१३ या मोठ्या कारकिर्दीत त्याच्या भात्यातून ५१ कसोटी शतके पाहायला मिळाली आहेत.
क्लिक करा