Tap to Read ➤

Ghibli AI Trend : नव्या ट्रेंडसह क्रिकेटमधील जुन्या आठवणींना उजाळा

चॅटजीपीटीच्या घिब्ली इमेजचा एक नवा ट्रेंड सध्या चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या ट्रेंडसह अ‍ॅनिमेशन फोटोसह जुन्या आठवणीत रमल्याचे पाहायला मिळाले.
चॅटजीपीटीच्या घिब्ली इमेजच्या व्हायरल ट्रेंडमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सामील झालाय. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून २०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील अविस्मरणीय क्षणांना अ‍ॅनिमेटेड इमेजेसच्या माध्यमातून उजाळा दिलाय.
रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं नुकतीच विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. कॅप्टन रोहितचा फोटोही या नव्या ट्रेंडसह व्हायरल होताना दिसतोय.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्यातील मैदानातील खास क्षणही अ‍ॅनिमेटेड इमेजेसह पुन्हा चर्चेत आलाय.
आयपीएल स्पर्धा सुरु नव्या ट्रेंडमध्ये चेन्नई सुपर किंग्स अन् मुंबई इंडियन्सच्या यशस्वी कर्णधारांची खास फ्रेम दिसणार नाही असे कसे होईल.
क्रिकेटमधील हा खास क्षण कोणत्या स्पर्धेतील विजयानंतरचा आहे अन् या फ्रेममधील जोडी कोणती ते  क्रिकेट चाहत्यांना वेगळी सांगायची गरज नाही.
एमएस धोनीचा जुना अवतारही नव्या ट्रेंडमध्ये टॉपला आहे.
२०२४ मध्ये  टी-२० वर्ल्ड कप विजेतेपद पटकवल्यानंतर  किंग कोहली आणि रोहित शर्माचा नवा अवतार.
इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात सौरव गांगुलीनं बाल्कनीत टी शर्ट काढून केलेल्या सेलिब्रेशनचा अ‍ॅनिमेटेड इमेजमधील खास फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
क्लिक करा