Tap to Read ➤
पश्चिम बंगालचा अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प २०२३'चा विजेता
'सा रे ग म प २०२३' या सिझनचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
‘सा रे ग म प २०२३’ सिझनचा ग्रँड फिनाले कमाल होताच, शिवाय यंदाचं पर्वही खूप खास ठरलं आहे.
सुप्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया, अनु मलिक आणि नीती मोहन यांनी या शोमध्ये जजची भुमिका पार पाडली.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून झी टीव्हीवर हा शो सुरू होता.
अखेरीस या पर्वाला विजेता मिळाला आहे.
पश्चिम बंगालमधील कलिम्पोंग येथील अल्बर्ट काबो लेप्चा हा या सीझनचा विजेता ठरला.
'सा रे गा म प २०२३' विजेता अल्बर्ट काबोने आपल्या सुरांच्या जादूने प्रेक्षकांवर भूरळ घातली.
अटीतटीच्या लढतीत अल्बर्टने 'सा रे ग म प २०२३' च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
क्लिक करा