Tap to Read ➤
वयानुसार किती असावा धावण्याचा वेग?
धावणे हा विनाखर्च करता येणारा सर्वात सोपा व्यायाम आहे
नियमित धावण्याने वजन नियंत्रणात राहतं आणि हृदयाचे विकारही होत नाही
पण तुमच्या धावण्याचा वेग किती असावा हे तुमच्या वयावरही अवलंबून असतं
साधारण १.६ किलोमीटर अंतर कापायला प्रत्येक वयोगटातील लोकांना किती वेळ लागणं अपेक्षित आहे बघुया
२० ते ३० वर्ष वयोगटातील पुरुषांना ६.३७ मिनिटे तर महिलांना ७.४९ मिनिटे किंवा यापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे
३० ते ४० वयोगटातील पुरुषांना ६.४७ मिनिटे आणि महिलांना ७.४९ मिनिटे लागले पाहिजे
४० ते ५० वयोगटातील पुरुषांना ७.१४ मिनिटे आणि हेच महिलांना ८.१७ मिनिटांटा वेळ लागला पाहिजे
५० ते ६० वयोगटातील पुरुषांना ७.५० मिनिटे आणि महिलांना ९.११ मिनिटांचा किंवा यापेक्षा कमी वेळ लागणं अपेक्षित आहे
मॅनहॅटन येथील लाइफटाइम स्कायचे रनिंग कोच ग्यूसेप्पे कैरोना यांनी हा अहवाल दिला आहे
जर तुम्हाला तुमच्या वयानुसार जास्त वेळ लागत असेल तर याचा अर्थ तुम्हाला एकंदर फिटनेसवर लक्ष द्यावं लागेल
क्लिक करा