चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धेतील हे ८ खेळाडू यंदाही उतरणार मैदानात
या आठ खेळाडूंमध्ये भारतीय संघाच्या ताफ्यातील किती जण आहेत माहितीये?
रोहित शर्मानं २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून नियमित ओपनिंगला सुरुवात केली होती. २०१३ च्या हंगामातील चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने ५ सामन्यातील २ अर्धशतकाच्या मदतीने १७७ धावा काढल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरनं २०१३ च्या हंगामात ११३ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात तो या संघाचा प्रमुख फलंदाज असेल.
ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील ग्लेन मॅक्सवेल हा देखील २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसला होता. दोन सामन्यात संधी मिळाल्यावर त्याने ६१ धावा केल्या होत्या. तो पुन्हा एकदा या स्पर्धेत खेळताना दिसेल.
जोस बटलरसाठी २०१३ चा हंगाम एखाद्या भयावह स्वप्नासारखा होता. ५ सामन्यात त्याने फक्त १५ धावा केल्या होत्या. दोन सामन्यात तर त्याला खातेही उघडता आले नव्हते.
इंग्लंडच्या ताफ्यातील जो रूट हा देखील २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसले होते. ५ सामन्यात त्याने ३४ च्या सरासरीने १७३ धावा काढल्या होत्या.
विराट कोहलीनं २०१३ च्या टी-२० फॉर्मेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताकडून सर्वाधिक ४३ धावा केल्या होत्या.
रवींद्र जडेजाने २०१३ मध्ये ५ सामन्यात १२ विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
न्यूझीलंडचा केन विलियम्सन हा देखील २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणारा खेळाडू आहे. त्याने ३ सामन्यात ५० च्या सरासरीने १०१ धावा केल्या होत्या.