Tap to Read ➤

विराट-रोहितसह या ५ खेळाडूंसाठी अखेरची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा?

भारतीय संघाला चॅम्पियन्स करण्याची जबाबदारी असणाऱ्या या चेहऱ्यांवर असतील सर्वांच्या नजरा
यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी रोहित शर्मासह विराट कोहली आणि अन्य काही स्टार खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील.
इथं एक नजर टाकुयात यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत  दिसणाऱ्या अशा चेहऱ्यांवर जे कदाचित आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दिसणार नाहीत.
रवींद्र जडेजा टीम इंडियातील मॅच विनिंग खेळाडूंपैकी एक आहे. तो तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो २६ वर्षांचा असून तो पुन्हा या स्पर्धेत खेळताना दिसणे जवळपास मुश्किल वाटते.
स्टायलिश क्रिकेटर लोकेश राहुल हा पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे ही स्पर्धा त्याच्यासाठी पहिली आणि अखेरची ठरू शकते. कारण आगामी चार वर्षांत तो टीम इंडियातील आपलं स्थान पक्के ठेवणं कठीण आहे.
मोहम्मद शमीवर यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाच्या गोलंदाजाची प्रमुख धूरा असेल. हा जलदगती गोलंदाजासाठीही यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा कदाचित शेवटचीच असेल.
विराट कोहली २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग आहे. पाचव्यांदा तो आयसीसीच्या इवेंटमध्ये खेळताना दिसणार आहे. २०२७ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो निवृत्ती घेईल, अशी चर्चा अनेकदा रंगताना दिसते. त्यामुळे तो पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसेल, असे वाटत नाही.
रोहित शर्मा सध्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो दिसणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
क्लिक करा