रोहित वजन कायच नाही, क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षाही अधिक 'वजनदार' गडी मैदानात उतरलेत अन् त्यांनी मैदानही गाजवलंय
भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा जाड आहे, त्यामुळे तो फिट वाटत नाही, अशा आशयाची कमेंट करत काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी हिटमॅनला 'फॅटमॅनचा टॅग लावला. हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
वाढत्या वजनामुळे एखाद्याच्या फिटनेसवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला माहितीये का? रोहित हा काही सर्वाधिक वजन असणार क्रिकेटर नाही. त्याच्यापेक्षाही अधिक 'वजनदार' क्रिकेटर्संची झलक पाहायला मिळाली आहे एवढेच नव्हे तर त्यांनी आपली छापही सोडलीये. एक नजर त्या क्रिकेटर्सवर
ऑस्ट्रेलियन वॉरविक आर्मस्ट्राँग हा क्रिकेट जगतातील सर्वात 'वजनदार' क्रिकेटर होता. १३३ किलोग्रॅम वजन असताना हा क्रिकेटर मैदानात उतरायचा. १९०२ ते १९२१ या कालावधीत या क्रिकेटरनं आपल्या अष्टपैलू खेळानं क्रिकेटमध्ये आपली जादू दाखवून दिलीये.
वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर रहकीम कॉर्नवॉल हा क्रिकेट जगतातील सर्वात वजनदार क्रिकेटरपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळ त्याचे वजन १४० किलो इतके होते. पण त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीनं वजन माझ्या कामगिरीच्या आड येऊ शकत नाही ते दाखवून दिले.
२००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बर्म्युडाच्या ताफ्यातील ड्वेन लेव्हरॉक याने आपल्या कॅचनं सर्वांनाच आश्चर्यचिकत केले होते. १२७ किलो वजन असताना त्याने जो कॅच पकडला तो पाहून फिटनेससाठी वजनाचे दाखले देऊ नका, असाच काहीसा सीन या क्रिकेटपटूने क्रिएट केला होता.
श्रीलंकेचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन अर्जुन रणतुंगा याचाही समावेश होता. ११५ किलो वजन असल्यामुळे आशियातील तो सर्वात अनफिट खेळाडू आहे, असे म्हटले जायचे. पण या क्रिकेटरनं १९९६ ला आपल्या संघाला वर्ल्ड चॅम्पियन केले अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ हजारहून अधिक धावाही केल्या.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल-हक याचे वजनही जवळपास १०० किलोग्रॅम इतके होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजारहून अधिक धावा काढल्या आहेत.