'हिटमॅन'ला लागला 'फ्लॉप' कॅप्टनचा टॅग! हे आहेत सर्वाधिक अपयशी कर्णधार
रोहित शर्माच्या नावे झाली लाजिरवाण्या कामगिरीची नोंद
अॅडिलेडच्या मैदानातील रोहित शर्माच्या कमबॅक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं कसोटी मालिकेत कमबॅक केलं अन् रोहित शर्माच्या नावे कॅप्टन्सीतील लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
कसोटीत सातत्याने सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या कॅप्टन्सच्या यादीत रोहित शर्मा संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.
घरच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाला सलग तीन सामन्यात पराभूत करत इतिहास रचला होता. त्यानंतर आता अॅडिलेड कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग चौथ्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
सलग सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कॅप्टन्सच्या यादीत मन्सूर अली खान पतौडी अव्वलस्थानी आहेत. १९६७ -६८ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली १९९९-२००० या कालावधीत भारतीय संघाने सलग ५ सामन्यात पराभवाचा सामना केला होता.
रोहित शर्माशिवाय (२०२४) दत्ता गायकवाड, एमएस धोनी (२०११, २०१४), विराट कोहली (२०२०-२१) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग चार कसोटी सामने गमावल्याचा रेकॉर्ड आहे.
रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाला आठव्यांदा कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याबाबतीत रोहितनं गावसकरांच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केलीये.
पण गावसकरांच्या नेतृत्वाखाली ४७ कसोटी सामन्यात टीम इंडियाने ८ सामने गमावले होते. रोहितच्या कॅप्टन्सीत २२ सामन्यात ८ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.