PICS : लग्न वाढदिवस! प्रेमात पडल्यापासून माझं आयुष्य बदलणारा व्यक्ती
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.
लग्न वाढदिवसानिमित्त रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी काही फोटो शेअर केले आहेत.
रितिकाने खास चारोळ्या लिहित रोहितला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
"प्रेमात पडल्यापासून माझं आयुष्य बदलणारा व्यक्ती... माझा सर्वात जवळचा मित्र बनल्याबद्दल धन्यवाद, माझा विनोदी कलाकार, माझा आवडता माणूस आणि माझं घर. तुझ्यासोबतचं आयुष्य म्हणजे जादुईपेक्षा कमी नाही", असे रितिकाने कॅप्शनमध्ये म्हटले,
रोहित अन् रितिका यांच्या लग्नाची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखीच आहे.
रितिका ही रोहितची मॅनेजर होती आणि या प्रोफेशनल नात्यातूनच हे प्रेम बहरलं.