IPL आधी पंतच्या घरात लगीन घाई; ताईच्या लग्नात रिषभ भाईचा कूल अंदाज
आयपीएल आधी स्टार विकेट किपर बॅटर घरातील लग्न कार्यक्रमात अगदी कूल अंदाजात मिरवताना दिसला. एक नजर रिषभ पंतच्या व्हायरल होणाऱ्या खास फोटोंवर
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी पंतच्या घरात लगीन घाई सुरु आहे. या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रिषभ पंत दुबईतून मायदेशी परला अन् लगेच त्याच्या घरी मोठी बहिण साक्षीच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना धमाक्यात सुरुवात झाली.
रिषभ पंतची बहिण साक्षी ही लाँग टाइम बॉयफ्रेंड अंकित चौधरीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. बहिणीच्या साखरपुड्यातही पंतचा रुबाब पाहायला मिळाला होता.
बहिणीच्या लग्नात मग्न असलेल्या रिषभ पंतचे कूल अंदाजातील काही फोटोही चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातीलच हा एक फोटो
पंतच्या ताईच्या लग्नाला दिग्गज क्रिकेटर्संनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी या स्वीट कपलसह रैनाही आपल्या पत्नीसोबत स्पॉट झाला. या फोटोत पृथ्वी शॉचीही झलक पाहायला मिळते.
रिषभ पंतची बहिण साक्षी आणि अंकित यांच्या विवाहसोहळा उत्तराखंडमधील मसूरी येथे पार पडणार आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक स्टार या लग्न समारंभाला हजेरी लावणार आहेत.