पण समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्यात साखरपुडा झालेला नाही, हे आता समोर येतीये.
खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांनी रिंकू सिंह आणि आपल्या मुलीसंदर्भात रंगणाऱ्या साखरपुड्याचे वृत्त फेटाळले आहे.
साखरपुड्याचे वृत्त खरं नसलं तरी खासदार प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांच्यात लग्नाची बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी शेअर केलीये.
प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंह याच्या कुटुंबियांकडून लग्नाची बोलणी सुरु केलीये. आम्ही यासंदर्भात विचार करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रिया सरोज या सर्वात कमी वयातील खासदारांपैकी एक आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वयाच्या २५ व्या वर्षी त्या खासदार म्हणून निवडून आल्यात.
रिंकू सिंह हा क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा आहे. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर त्याने टीम इंडियातही एन्ट्री मारली आहे.