जिंदल, पूनावाला, नाडर, एका वर्षात कोणच्या संपत्तीत झाली सर्वाधिक वाढ?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यानुसार, उद्योगपती मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र गेल्या वर्षभरात संपत्तीत सर्वाधिक वाढ झालेल्या व्यक्तींच्या यादीत सायरस पुनावाला पहिल्या क्रमांकावर आहेत.
सिरम इन्स्टिट्युटचे सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती २,७८,५०० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत ७३,१०० कोटींची वाढ झालीये.
एचसीएलचे शिव नाडर यांच्या संपत्तीत एका वर्षात ४३,१०० कोटी रुपयांची वाढ झालीये. त्यांची एकूण संपत्ती २,२८,९०० कोटी रुपये आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सन फार्माचे दिलीप सांघवी आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,६४,३०० कोटी रुपये असून यात वर्षभरात ३०,८०० कोटींची वाढ झालीये.
चौथ्या क्रमांकावर आरजे कॉर्पच्या रवी जयपुरीया यांचं नाव आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या वर्षात २७,७०० कोटी रुपयांची वाढ झालीये. त्यांची एकूण संपत्ती ९१,६०० कोटी रुपये आहे.
सज्जन जिंदल यांची एकूण संपत्ती ८१,२०० कोटी रुपयांची असून यात गेल्या वर्षात २६,७०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्राचे पी.पीची रेड्डी हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत २४,७०० कोटींची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती ३७,३०० कोटी आहे.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्राचेच पीव्ही कृष्णा रेड्डी यांच्या संपत्तीत या कालावधीत २३,७०० कोटी रुपयांची वाढ झाली. त्यांनी एकूण संपत्ती ३५,८०० कोटी रुपये आहे.
झायडस लाइफ सायन्सेस, फार्माचे पंकज पटेल यांच्या संपत्तीत या कालावधीत १९१०० कोटी रुपयांची वाढ झाली.
डीएलएफचे राजीव सिंग यांची एकूण संपत्ती ७८,९०० कोटी रुपये असून गेल्या वर्षात त्यांच्या संपत्तीत १७,६०० कोटींची वाढ झाली.
शापूरजी पालनजीचे इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर शापूर पालनजी मिस्त्री यांच्या संपत्तीत १६,५०० कोटी रुपयांची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती ७०,८०० कोटी आहे.