Tap to Read ➤
रिया चक्रवर्तीला कास्ट करण्यास दिग्दर्शक घाबरतात?
ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली...
ड्रग्ज प्रकरणात जेलमध्ये गेलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी 2020 हे वर्ष खूप वाईट होतं.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
रियावर सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप होता. यामुळे अभिनेत्री दीर्घकाळ वादांच्या भोवऱ्यात राहिली.
वादांचा परिणाम अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफवर देखील झाला. तिनेच याचा खुलासा केला.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रियाने तिच्या करियरबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.
"आता लोकं मला चित्रपटात घ्यायला घाबरतात. पण मला आशा आहे की सर्वकाही शक्य तितक्या लवकर ठीक होईल."
"पूर्वीपेक्षा अनेक गोष्टी चांगल्या झाल्यात. खरं सांगायचं तर ट्रोलर्स आता मला टार्गेट करत नाहीत" असं रियाने म्हटलं.
रिया चक्रवर्ती रोडीज या रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे.
क्लिक करा