Tap to Read ➤
"तुमच्या बेडरूममध्ये कॅमेरा लावला असेल तर..."; रियाने स्पष्टच सांगितलं
सुशांतसोबतचे पर्सनल चॅट्स लीक होण्याबद्दल रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची जोरदार चर्चा रंगली होती.
रियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तसेच तिला खूप ट्रोल करण्यात आलं.
सुशांतचे WhatsApp चॅट्स लीक झाले होते, त्याबद्दल आता रियाने खुलासा केला आहे.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना रियाचे सुशांतबरोबरचे तसेच चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि इतर काही चॅट्स लीक झाले होते.
"प्रायव्हसी ही चॉईस नाही तर नियम पाहिजे, कोणीतरी आपल्या आयुष्यात डोकावतंय हे कुणालाच आवडणार नाही."
"एखादी व्यक्ती दहशतवादी नसेल किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नसेल तर सर्वांना खासगी आयुष्य जगण्याचा हक्क आहे."
"आपलं आयुष्य किती खासगी ठेवायचं आणि किती सार्वजनिक करायचं, याचा प्रत्येकालाच हक्क आहे."
"तुम्ही तुमच्या पत्नीसोबत आहात आणि तुमच्या बेडरुममध्ये कॅमेरा लावला असेल तर तुम्हाला कसं वाटेल? अर्थात चांगलं वाटणार नाही."
"मलाही आवडलं नव्हतंच की कोणीतरी माझे पर्सनल चॅट्स वाचतंय, मग ते मेसेजेस मी पार्टनरला केलेले असोत"
"मित्रांना केलेले असोत किंवा माझ्या कुटुंबाला केलेले असोत" असं रियाने म्हटलं आहे.
क्लिक करा