Tap to Read ➤

कोण आहेत भक्ती मोदी? मुकेश अंबानींच्या कंपनीत सोपवलंय महत्त्वाचं काम

काही महिन्यांपासून रिलायन्स रिटेलमध्ये भक्ती मोदी या अधिक सक्रिय झाल्या आहेत.
मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानी साभाळत आहेत. काही महिन्यांपासून रिलायन्स रिटेलमध्ये भक्ती मोदी या अधिक सक्रिय झाल्या आहेत. जाणून घेऊ कोण आहेत त्या?
भक्ती मोदी या मनोज मोदी यांच्या कन्या आहेत. मनोज मोदी अंबानींचे राईट हँड मानले जातात. ईटीच्या रिपोर्टनुसार भक्ती मोदी रिलायन्स रिटेल व्हेन्चर्सच्या लीडरशीप टीममध्ये आहेत.
त्यांच्याकडे रिलायन्स रिटेलमध्ये स्ट्रॅटजी आणि न्यू बिझनेस इनिशिएटिव्हची जबाबदारी आहे.
भक्ती या ब्युटी प्रोडक्टसाठी ओन्मी चॅनल प्लॅटफॉर्म टिरामध्ये स्ट्रॅटजी आणि एक्झिक्युशनही सांभाळतात.
त्या टिराच्या को-फाऊंडर देखील आहे. टिरा एप्रिल २०२३ मध्ये लाँच करण्यात आलं होतं. ईशा अंबानीही त्याचं काम पाहतात. २०२२ मध्ये भक्ती मोदींना रिलायन्स ब्रँड्सचं डायरेक्टर म्हणून नियुक्त केलं होतं.
मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते रिलायन्स रिटे, ईआयएच आणि जिओ प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळातही आहेत.
क्लिक करा