अंबानींनी बनवला देशातला सर्वात मोठा लक्झरी मॉल, पाहा इन्साईड फोटो
अंबानी कुटुंबानं देशातील सर्वात महागडा मॉल सुरू केला आहे.
मुंबईत भव्य कल्चरल सेंटरनंतर आता अंबानी कुटुंबानं देशातील सर्वात महागडा मॉल सुरू केला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजनं मुंबईत ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉल सर्वांसाठी खुला केला.
‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ हा देशातील पहिला सर्वात मोठा लक्झरी मॉल असल्याचं म्हटलं जातं.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेला हा मॉल ७५०० स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे.
देशातील हा पहिला मोठा आणि लक्झरी मॉल असल्यानं अनेक महागड्या परदेशी लक्झरी ब्रँड्सना येथे जागा देण्यात आली आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
अंबानी कुटुंबाच्या या मॉलमध्ये बॅलेन्सी, कार्टियर, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी-संदीप खोसला, पॉटरी बार्न आणि गुच्ची यासह जगभरातील महागड्या ब्रँड्सचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुई व्हिटॉन अंबानींच्या मेगा मॉलमध्ये आपले स्टोअर उघडण्यासाठी दरमहा ४० लाख रुपये भाडे देणार आहे.
ज्वेलरी आणि घड्याळ कंपनी कार्टरनेही या मॉलमध्ये शॉप घेतले आहे. या फ्रेंच कंपनीच्या घड्याळांची किंमत ३ हजार डॉलर्सपासून ते ३० हजार डॉलर्सपर्यंत आहे.