Tap to Read ➤

१ रुपयात नोंदणी करा; अन् सरकारी योजनांचा लाभ मिळवा!

कामगार विभागाच्या लिंकवर जाऊन नोंदणी करता येऊ शकते.
बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजना राबविल्या जात असून, त्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
आता ही नोंदणी फक्त १ रुपयात करण्यात येत आहे.
कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता येत असून, अधिकाधिक कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर कामगार विभागाच्या लिंकवर जाऊन नोंदणी करता येणे शक्य आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ मोबाइलवर ओपन केल्यावर सहजच नोंदणी करता येते.
काय लागते?
१.वयाचा पुरावा २.रहिवासी दाखला ३.दहा दिवस काम केल्याचा पुरावा ४.ओळखपत्र पुरावा ५.तीन पासपोर्ट फोटो ६.वयाची मर्यादा ही किमान १८ ते कमाल ६० वर्षे