Tap to Read ➤

कर्ण-अर्जुन यांच्या पूर्वजन्माची कथा वाचून थक्क व्हाल!

महाभारतल्या धनुर्धारी अर्जुनाला आपण ओळखतोच, त्याच्या गत जन्माबद्दलही जाणून घेऊ!
पौराणिक कथांच्या अनुसार अर्जुन पूर्वजन्मात नारायणाचे भाऊ नर होते म्हणून नर नारायण ही जोडी म्हटली जात असे.
दंभोद्भवा नावाच्या राक्षसाचा नाश करण्यासाठी नर नारायणाचा अवतार झाला होता.
या राक्षसाने सूर्यदेवाची तपश्चर्या करून १००० कवचाचे वरदान मिळवले होते.
सूर्याकडून हजार पट मिळालेल्या कवचाच्या बळावर तो उन्मत्त झाला होता.
तेव्हा नर नारायणाने मिळून घनघोर तप केले आणि त्याचे ९९९ कवच तोडले.
मात्र शेवटच्या क्षणी त्या राक्षसाने नराचा वध केला परंतु नारायणाने आपल्या तप सामर्थ्याच्या बळावर नराला जीवित केले.
तो दंभोद्भवा भीतीने सुर्यामागे जाऊन लपला, त्याला महाभारताच्या काळात अर्जुन आणि कृष्ण या नर नारायण जोडीने मिळून संपवले.
तो राक्षस दुसरा तिसरा कोणी नसून एक कवच कुंडल शिल्लक असलेला सूतपुत्र कर्ण होता.
क्लिक करा