अभिनेत्री रश्मिका मंदानाचं निखळ सौंदर्य
अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची प्रत्येक भूमिका विशेष लक्ष वेधून घेते.
रश्मिका सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिने आता तिचे काही सुंदर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
साडीमध्ये रश्मिका फारच कमाल दिसत आहे, निखळ सौंदर्य पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीचे संख्य चाहते आहेत. ते तिच्या अदांवर घायाळ होतात.
रश्मिकाने पुष्पा, छावा, सिकंदरसह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
रश्मिकाने आयुषमान खुरानासोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'थामा'चं शुटिंग सुरू केलं आहे.