या राशीसाठी आज खर्चाचा दिवस, तुमचा विकेंड कसा जाणार...
आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५, शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानात असेल.
एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार - विनिमय करण्यास संधी मिळेल.
आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीने एखाद्याची समजूत घालू शकाल.
आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल. आज आपण सर्वांसह एखादा आनंददायक प्रवास ठरवण्याची सुद्धा शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील.
बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज व मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.
परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील.
राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहावे. नवीन संबंध विकसित करू नयेत. एखादी दुर्घटना संभवते. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल. विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल.
व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे.
प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची प्रकृती किंवा अभ्यास ह्या बध्दल चिंता लागून राहील.
कोर्ट - कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.