आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री राणी मुखर्जीने हिंदी चित्रपटसृष्टीतील २७ वर्षे पूर्ण केली आहेत.
राणीने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत.
गेल्या 27 वर्षांत तिनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.
नुकतेच सोशल मीडियावर राणी मुखर्जीचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळत आहेत.
रानी मुखर्जीने हम तुम, वीर-जारा, बंटी और बबली, ब्लैक, गुलाम, युवा आणि राजा की आएगी बारात या चित्रपटात काम केले आहे.