Tap to Read ➤

माहितीये कोण आहे 'राम आएंगे'नं मंत्रमुग्ध करणारी गायिका?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलेलं कौतुक...
मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल. परंतु हे गाणं कोणी गायलंय हे तुम्हाला माहितीये का? आज जाणून घेऊ त्या गायिकेबद्दल.
आज अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देश-परदेशातील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वस्ति मेहुल यांनी गायलेल्या या गाण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं आहे.
या गाण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष ट्वीटही केलं होतं. रामललाच्या स्वागतासाठी स्वति मेहुल यांचं भक्ती भावासह गायलेलं गाणं मंत्रमुग्ध करणारं आहे, असं ते म्हणाले होते.
स्वस्ति मेहुल या शिवपुरीचे व्यापारी स्व. अरविंद जैन यांच्या कन्या आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत राहतात.
त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आपल्या भावंडांकडून त्यांना गाण्याची प्रेरणा मिळाली.

Your browser doesn't support HTML5 video.

स्वस्ति मेहुल यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या मिता पंडित यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंय.
स्वस्ति मेहुल सोशल मीडियावर सक्रिय असतात. तसंच त्या आपली गाणी सोशल मीडियाद्वारे शेअरही करतात. यापूर्वी कोरोना काळात कोरोना को दूर भगाना है हे त्यांचं गाणंही प्रसिद्ध झालं होतं.
क्लिक करा