जाणून घेऊयात कोण किती शिकलंय? आणि कोणत्या ठाकरे बंधूने सगळ्यात जास्त शिक्षण घेतलंय.
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंकडून आज मुंबईत विजयी मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यासोबत अमित आणि आदित्य ठाकरेही एकत्र आले.
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन झालेल्या आरोप-प्रत्यारोपात ठाकरेंच्या मुलांच्या शिक्षणाचाही मुद्दा समोर आला.
यानिमित्ताने जाणून घेऊयात कोण किती शिकलंय? आणि कोणत्या ठाकरे बंधूने सगळ्यात जास्त शिक्षण घेतलंय.
उद्धव ठाकरे यांनी बालमोहन विद्यामंदिर येथून प्राथमिक शिक्षण घेतलंय. तर जेजे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
राज ठाकरेही बालमोहन विद्यामंदिर या मराठी शाळेत शिकले. त्यांनीही जेजे स्कूल ऑफ आर्टसमधून पुढचं शिक्षण घेतलं.
आदित्य ठाकरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले. त्यांनी केसी कॉलेजमधून 'बॅचलर ऑफ लॉ'ची डिग्री घेतली आहे.
तर अमित ठाकरेंनी मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे.