Tap to Read ➤

IND vs NZ : कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर

इथं एक नजर टाकुयात न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ भारतीय फलंदाजांवर
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे.
या मालिकेत किंग कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. इथं एक नजर टाकुयात न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ भारतीय फलंदाजांवर
विराट कोहलीनं आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्धच्या ११ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २१ डावात ४५.५७ च्या सरासरीनं ८६६ धावा काढल्या आहेत. यात ३ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचाही समावेश आहे. त्याने ३९.४० च्या सरासरीने २ शतकं आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ८६७ धावा केल्या आहेत.
वीरेंद्र सेहवागनं न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या १२ सामन्यातील २१ सामन्यात २ शतकं आणि ३ अर्धशतकासह ८८३ धावा केल्या आहेत. त्याच्या धावांची सरासरी ४४.१५ अशी आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या २४ कसोटी सामन्यातील ३९ डावात त्याच्या खात्यात १५९५ धावा आहेत. यात ४ शतकं आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.
राहुल द्रविड या यादीत सर्वात आघाडीवर आहे. त्याने १५ सामन्यातील २८ डावात ६३.८० च्या सरासरीनं १६५९ धावा केल्या आहेत. यात ६ शतकं आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
क्लिक करा