Tap to Read ➤

नवरी नटली गं! आईचे दागिने अन् पानेतर लेहंगा; राधिकाचा  ब्रायडल लूक

गेल्या काही दिवसांत माध्यम जगतात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती.
अखेर अनंत-राधिका यांनी काल १२ जुलैला लग्नगाठ बांधली.
सध्या सोशल मीडियावर राधिका मर्चंटचे ब्रायडल लूकमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
लग्नासाठी नववधू राधिकाने सुंदर असा गुजराती पानेतर लेहंगा परिधान केला होता.
लाल आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या लेहंग्यामध्ये राधिकाचं सौंदर्य खुललं आहे.
विशेष म्हणजे या लेहंग्यावर सोन्याचे भरतकाम करण्यात आलं आहे.
आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवशी राधिकाने तिच्या आईची एक आठवण जपली आहे.
लग्नामध्ये अंबानींच्या नव्या सुनबाईंनी तिच्या आईचे दागिने परिधान केले होते.
अबू जानी यांनी डिझाईन केलेल्या या लेहंग्यामध्ये नववधू राधिका फारच सुंदर दिसत आहे.
क्लिक करा