Tap to Read ➤

विदेशी गायकासोबत राधिका आपटेनं थाटलाय संसार

उत्तम अभिनयासह बोल्डनेसमुळे राधिका सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. उत्तम अभिनयासह बोल्डनेसमुळे राधिका सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेल्या राधिकाच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांना माहित आहे. मात्र, पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना ठावूक आहे.
राधिकाने लंडनमधील प्रसिद्ध गायक बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला 8 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे.
राधिका आणि बेनेडिक्टची पहिली भेट लंडनमधील एका डान्स क्लासमध्ये झाली होती. याठिकाणी राधिकादेखील डान्सचे धडे गिरवित होती.
डान्स क्लासमध्येच राधिका बेनेडिक्टच्या प्रेमात पडली.त्यानंतर लंडनमध्येच ती त्याच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहू लागली.
एक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्या दोघांनी कोर्ट मॅरिज केले. त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाच माहित नव्हते. लग्नामध्ये त्या दोघांनी एकही फोटो काढला नाही. विशेष बाब म्हणजे लग्नात राधिकाने आजीची साडी नेसली होती.
२०१३मध्ये राधिकाने ५ महिन्यांपूर्वी केलेल्या लग्नाच्या निमित्ताने रिसेप्शन देऊन सर्वांना थक्क केले होते.
क्लिक करा