प्रपोज करतांना करु नका चूक, नाहीतर प्रेम जुळायच्या आधीच व्हायचं हार्ट ब्रेक!

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी बिनधास्तपणे आपलं प्रेम व्यक्त करतात.

आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करणं म्हणजे प्रपोज करणं.

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी बिनधास्तपणे आपलं प्रेम व्यक्त करतात.

अनेकदा काही जणांना या प्रेमाच्या परिक्षेत अपयश येतं. मात्र, प्रपोज करतांना काही चूका टाळल्या तर हे अपयश नक्कीच वाट्याला येणार नाही.

अनेकजण अचानक सरप्राइज देऊन प्रपोज करतात. मात्र, असं करण्यापूर्वी तरुणीच्या मनात तुमच्या बद्दल भावना आहेत का ते जाणून घ्या.

तुम्ही एखाद्या तरुणीला प्रपोज केलं आणि तिच्या मनात तुमच्याविषयी भावना नसतील तर मात्र ती सगळ्यांसमोर तुम्हाला नकार देऊ शकते.

काही तरुण, मुलींना इंप्रेस करण्यासाठी पब्लिकली प्रपोज करतात. मात्र, काही मुलींना त्यांचं नात सिक्रेट ठेवायला आवडतं.

 जर तुम्ही जगजाहीरपणे हे नातं दाखवलं तर त्या (मुली) घरातल्यांच्या किंवा  समाजाच्या भितीने तुम्हाला नकार देऊ शकतात.

'या' चुकीमुळे आय मेकअप केल्यावर होतो डोळ्यांना त्रास!

Click Here