Tap to Read ➤

"प्रत्येकाची स्वत:ची चॉईस असते"; अभिनेत्रीने केला बॉडी शेमिंगचा सामना

"खरं तर बिग बॉसच्या घरातही असं घडलं..."; प्रियंकाने स्पष्टच सांगितलं
प्रियंका चाहर चौधरी ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री तिच्या एक्टिंग स्किल आणि फ्लॉलेस स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
'उडारीयां', 'स्वप्नोदना', 'ये है चाहतीं', 'गठबंधन' यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
बिग बॉस 16 मध्ये असलेल्या या अभिनेत्रीने एका मुलाखतीत बॉडी शेमिंगचा अनुभव सांगितला आहे.
ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, "होय, मी बॉडी शेमिंगचा सामना केला, खरं तर बिग बॉसच्या घरातही असं घडलं" असं म्हटलं आहे.
"आता याबद्दल जागरुकता आली आहे परंतु तरीही लोक जास्त वजन किंवा कमी वजन असेल तर बोलतात."
"कमी वजनामुळे मला अनेकदा बोललं गेलं. मला वाटतं की प्रत्येकाच्या शरीराला 25 नंतर व्यायामाची आवश्यकता असते."
"फिजिकली फिट राहण्यासाठी तुम्ही नेहमीच व्यायाम करता असं नसतं."
"असं का करावसं वाटतं यासाठी प्रत्येकाची स्वत:ची चॉईस असते" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
प्रियंका सोशल मीडियावर एक्टिव्ह असून आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
क्लिक करा