भक्तांसोबत आणखी किती वर्षे असणार प्रेमानंद महाराज?
प्रेमानंद महाराजांनी स्वतःच दिली माहिती
प्रेमानंद महाराज हे वृंदावनातील प्रसिद्ध आध्यात्मिक संत आहेत. मात्र ते एका गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. असे असूनही ते कृष्णाच्या भक्तीत तल्लीन असतात.
प्रेमानंद महाराजांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील सरसौल येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव अनिरुद्ध कुमार पांडे आहे.
प्रेमानंद महाराज दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. अशातच प्रेमानंद महाराजांनी स्वतःच सांगितले आहे की ते आणखी किती वेळ त्यांच्या भक्तांसोबत राहणार आहेत.
प्रेमानंद महाराजांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला ज्यामध्ये एका संताने त्यांना ते किती वर्ष जगणार असल्याचे सांगितले होते.
प्रेमानंद महाराजांनी त्या संताला सांगितले होते की त्यांची दोन्ही मूत्रपिंडे खराब आहेत आणि त्यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो. पण त्या संताने त्यांना तुम्ही ८० वर्षापर्यंत जगणार आहात.
प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, या घटनेला २० वर्षे पूर्ण झाली असून सध्या त्यांचे वय ५५ ते ५६ वर्षे आहे. त्यानंतर मी त्या संताला पुन्हा कधीही भेटलेलो नाही, असेही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.
प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो लोक त्यांच्या परिक्रमा मार्गावर वाट पाहत असतात.