Tap to Read ➤

''...म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाहीत''; प्राजक्ता माळीची खंत

प्राजक्ता माळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली.
नुकतीच एका मुलाखतीत प्राजक्ताने तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही, ही खंत व्यक्त केली आहे.
प्राजक्ता म्हणाली, माझ्याकडे काम नाही, अशी वेळ नशिबानं अजूनपर्यंत आलेली नाही. मी आजपर्यंत जितकं काम केलं आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त नाकारलं आहे.
मला कधीच कामाची कमतरता नाही जाणवली. परंतु, चित्रपटांच्या बाबतीत मला अजून हवं तसं काम मिळालेलं नाही. म्हणूनच कदाचित माझा कोणताच चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही, असे प्राजक्ता म्हणाली.
प्राजक्ताने सांगितले की, मालिका, नृत्य यांमध्ये बराच वेळ घालवला का? मी कोणत्याही ग्रुपचा भाग नाही. मला खोटं वागता येत नाही. माझ्या चेहऱ्यावर सगळं काही दिसतं किंवा मी ॲव्हरेज अभिनेत्री असेन, अशी बरीच कारणं असू शकतात.
काम मिळतं; पण जसं काम हवं तसं मिळवण्यासाठी सतत धडपड सुरू असते. एकदा एक काम मिळालं की, त्याचं आकर्षण कमी होतं आणि नवीन कामाची ओढ लागते. त्यामुळे महत्त्वाकांक्षा व समाधान यांचा समतोल साधता येणं महत्त्वाचं आहे, असे प्राजक्ताने सांगितले.
क्लिक करा