Post Office : एकदा करा ५०००० ची गुंतवणूक, कायम मिळतील ३३०० रुपये
पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहेत याचे फायदे...
सुरक्षित गुंतवणूकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यापैकी एक पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस एमआयएस स्कीम.
नावाप्रमाणेच यामध्ये महिन्याला पैसे मिळतात. या स्कीममध्ये महिन्याला पेन्शनच्या रुपात काही रक्कम मिळते.
तुम्ही जे पैसे स्कीममध्ये जमा करता, त्याचं व्याज मंथली इन्कम किंवा पेन्शनच्या रुपात तुमच्या खात्यात येतं.
जर एखाद्या व्यक्तीनं एमआयएस खात्यात एका वेळेस ५०००० रुपये जमा केले तर त्याला महिन्याला २७५ रुपये व्याजाच्या हिशोबानं वर्षाला ३३०० रुपये मिळतील.
खात्यात एकावेळी १ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला महिन्याला ५५० रुपयांचं व्याज मिळेल. तर वर्षाला ते ६६०० रुपये आणि ५ वर्षात तुम्हाला ३३००० रुपये मिळतील.
यामध्ये सिंगल अकाऊंटसाठी कमाल ४.५ लाख आणि जॉईंट अकाऊंटसाठी कमाल ९ लाख रुपये जमा करू शकता.
एखादी व्यक्ती किमान १००० रुपये आणि १०० रुपयांच्या पटीत रकमेनं एमआयएस खातं उघडू शकतो.