Tap to Read ➤

Post Officeच्या 'या' स्कीममध्ये होणार रक्कम डबल, सरकारची आहे 'गॅरंटी'

पाहा किती दिवसांत १० लाखाचे होणार २० लाख?
पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानमोठ्या बचत करण्यासंदर्भातील योजना कार्यान्वित आहेत. अनेकजण याचा लाभही घेत आहेत.
केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्टाद्वारे किसान विकास पत्र ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत ७.५ टक्के व्याज देण्यात येतंय.
यामध्ये तुम्ही केवळ १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. यामध्ये ११५ महिन्यांमध्ये तुमची गुंतवणूक दुप्पट होते.
या योजनेत ९ वर्ष ५ महिन्यांसाठी जर तुम्ही १० लाख गुंतवले तर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळेल. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर २० लाख मिळतील.
यात मुख्यत्वे अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
प्रौढ व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर तुम्हाला किसान विकास प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र सांभाळून ठेवणे आवश्यक असते.
क्लिक करा