१० वर्षांपूर्वीच Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल
पाहा कोणती आहे ही स्कीम, किती करावी लागेल गुंतवणूक
बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अंतर्गत १२ योजना चालवते. या योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जातात.
पोस्टात खातं उघडणारी स्कीम म्हणजेच किसान विकास पत्र. ११५ महिने म्हणजेच १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी या दुप्पट पैसे मिळतात.
किसान विकास पत्र नावाच्या या योजनेत गुंतवणूक करणार्या कोणत्याही गुंतवणूकदाराला चांगलं व्याज मिळतं. तसंच दीर्घ मुदतीत पैसे दुप्पटही होतात.
या सरकारी योजनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ७.५ टक्के व्याज दिलं जाणार आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभही मिळतो.
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत कोणतीही व्यक्ती फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.
जर कोणत्याही गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे दुप्पट करायचे असतील तर किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळेल.
जर तुम्ही त्यात दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत वीस लाख रुपयांचा परतावा मिळेल. लोकांना कमी रक्कम गुंतवूनही मोठा परतावा मिळाला आहे.