Tap to Read ➤

पंतप्रधानांपेक्षा UPSC अध्यक्षांना जास्त पगार; राष्ट्रपती, CJI किती...

देशातील टॉप ऑफिशिअल्सना पगार किती असतो, खूप औत्सुक्याचा प्रश्न लोकांना पडत असतो...
काही वर्षांपूर्वी एका कॉलेजमधील प्रोफेसर विद्यार्थ्यांना म्हणाले होते, जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त पगार असतो. कामही काही तास असते...
जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्ह्याची, कायदा सुव्यवस्थेची, राजकारण्यांना सांभाळण्याची २४ तास जबाबदारी असते, परंतू त्यांचा पगार प्राध्यापकांपेक्षा कमी का असतो असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला होता.
हे फक्त या पुरतेच मर्यादीत नाही तर अगदी पंतप्रधानांच्या बाबतीतही आहे. सर्व अधिकार असलेल्या पंतप्रधानांना सीजेआय, ईसीआय, UPSC, कॅग अशा संस्थांच्या प्रमुखांपेक्षाही कमी पगार मिळतो.
चला पाहुयात देशातील सर्वात टॉपच्या सरकारी ऑफिशिअल्सना किती पगार दिला जातो...
राष्ट्रपतींना ४००००० रुपये आणि इतर भत्ते असा पगार दिला जातो.
पंतप्रधानांना अधिकार सगळेच असतात पण त्यांना केवळ 160,000 (लोकसभा सदस्याचा पगार) अधिक लोकसभा सदस्यांचे भत्ते आणि पंतप्रधान पदाचे भत्ते असा पगार दिला जातो.
विविध राज्यांच्या गव्हर्नरांना पंतप्रधानांपेक्षा दोन लाख जास्त पगार दिला जातो. 350,000 आणि इतर भत्ते असे याचे स्वरुप असते.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना 280,000 रुपये पगार आणि इतर भत्ते असा पगार दिला जातो.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना 250,000 रुपये आणि इतर भत्ते असा पगार दिला जातो.
निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना 250,000 रुपये पगार आणि इतर भत्ते असे ब्रेकअप दिले जाते. असेच पेमेंट युपीएससी अध्यक्ष, कॅग अध्यक्ष आणि भारताचे कॅबिनेट सचिव यांना दिले जाते.