Tap to Read ➤
पितृपक्ष: ‘असे’ करा लक्ष्मीपूजन; लाभेल वैभव, धनवृद्धी, शुभ-लाभ होईल!
पितृपक्षातील शुक्रवारी लक्ष्मी देवीचे पूजन पुण्यफलदायी मानले जाते.
लक्ष्मी प्रसन्न झाल्यास कधीही पैशांची चणचण भासत नाही, अशी मान्यता आहे. शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पित मानला जातो.
शुक्रवारी लक्ष्मी पूजन केल्यास धनप्राप्ती होत असल्याचे मानले जाते. शुक्रवारी व्रत केल्यास लक्ष्मी देवीचा आशिर्वाद मिळतो.
लक्ष्मी पूजन करताना तिच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. कमळाचे फूल, लाल गुलाब, पांढरी मिठाई अर्पण करावी.
श्रावणी शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा विधीनुसार करावी. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्रीसूक्ताचेही पठण किंवा श्रवण करावे.
आर्थिक संकटात असाल तर दर श्रावणी शुक्रवारी लक्ष्मी स्त्रोत पाठ करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त ठरू शकते.
या दिवशी पांढरे वस्त्र, तांदूळ, तूप, कापूर, साखर, श्रृंगाराचे साहित्य, दही दान करणेही अत्यंत लाभदायक मानले जाते.
हा दिवस शुक्र ग्रहासाठी समर्पित मानला गेला असल्याने शुक्र मंत्र जपणे, शुक्राशी संबंधित वस्तूंचे दान करणे हिताचे ठरु शकेल.
यासह लक्ष्मी देवीच्या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. लक्ष्मी स्तोत्रांचे पठण शक्य नसेल तर श्रवण आवर्जून करावे.
पितृपक्ष सुरू असून, काही ठिकाणी गजलक्ष्मीचे विशेष पूजन केले जाते. यासह अमावास्येलाही लक्ष्मीचे पूजन केले जाते.
सर्वपित्री अमावास्येला १७८ वर्षांनी अद्भूत योग जुळून येत असून, लक्ष्मीची देवीची अपार कृपा लाभू शकते, धन-धान्य वृद्धी होऊ शकते, असे म्हटले जाते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
क्लिक करा