पितृपक्ष: ५ राशींना ध्रुव योग फळेल, शनी शुभ करेल; अशुभ प्रभाव टळेल!
पितृपक्षाची सुरुवात झाली असून, शनीचा शुभ प्रभाव काही राशींवर पडू शकेल.
२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पितृ पंधरवडा आहे. ३० सप्टेंबरला शनिवारी ध्रुव नामक शुभ योग जुळून येत आहे.
शनिवार हा शनी ग्रह देव, हनुमंतांना समर्पित मानला जातो. रेवती नक्षत्र अन् ध्रुव योगाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकेल.
ध्रुव योगामध्ये केलेले कोणतेही कार्य नेहमीच शुभ फल देते आणि सर्व प्रकारच्या अशुभ गोष्टींचा नाश करते, अशी मान्यता आहे.
पितृपक्षात ५ राशींवर शनी कृपा होऊ शकेल. तसेच काही उपाय केल्यास कुंडलीतील शनीचे स्थान मजबूत होऊ शकेल. असे सांगितले जात आहे. पाहुया...
मेष: लाभदायक काळ. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. व्यवसायात लाभ शक्य. चांगला नफा. नवीन नोकरीबाबत बातमी मिळेल. शनियंत्राची स्थापना करा. शनि चालिसा पठण करा. गरजूंना मदत करा.
मिथुन: समस्या कमी होतील. मन प्रसन्न राहील. कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. नोकरदारांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चांगला आर्थिक फायदा होईल. गरजूंची मदत करा अन् यथाशक्ती दान करा.
तूळ: व्यवसायात चांगली प्रगती. मन प्रसन्न राहील. चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता. यश मिळेल. शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. मनावरील ओझेही हलके होईल. शनी उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरेल.
कुंभ: सन्मान मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. मतभेद संपतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी. नोकरदारांना दुसऱ्या कंपनीचा कॉल येऊ शकतो. सुखसोयी वाढतील. सकाळ, सायंकाळी 'ॐ शं शनैश्चराय नमः' मंत्राचा जप करा.
मीन: शुभ आणि फलदायी काळ. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांचे पद, प्रभाव वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. शनीसंदर्भातील गोष्टींचे दान करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.