PF क्लेम सेटलमेंटसाठी का होतोय उशिर? EPFO नं सांगितलं कारण
ईपीएफओ अंतर्गत २७.७ कोटींपेक्षा अधिक खाती आहेत.
जर तुम्ही पीएफचे पैसे काढण्यासाठी क्लेम केला असेल आणि तुमचा क्लेम सेटल झाला नसेल, तर ईपीएफओनं याच्या विलंबाचं कारण सांगितलं आहे.
सॉफ्टवेअर अपडेशनमुळे अनेक समस्या येत आहेत, त्यामुळे मॅन्युअल काम करावं लागत आहे. याच कारणामुळे कामाचा ताण वाढल्याचं एका सीनिअर अधिकाऱ्यानं सांगितलं.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका सीनिअर अधिकाऱ्यानं सांगितलं की यापूर्वी क्लेम सेटलमेंटला ३० दिवसांचा कालावधी लागत होता. परंतु आता २० दिवसांचा कालावधी लागतो.
आयटी सिस्टममधील समस्यांमुळे मॅन्युअल माहिती टाकावी लागत आहे. जुनी सिस्टम विलंबासाठी जबाबदार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
गेल्या काही वर्षांपासून ईपीएफओमध्ये महत्त्वाच्या सॉफ्टवेअरची समस्या होती. गेल्या दोन तीन वर्षांमध्ये ही स्थिती आणखी खराब झाली.
ईपीएफओ अंतर्गत २७.७ कोटींपेक्षा अधिक खाती आहेत आणि जवळपास २० लाख कोटी रुपयांचा फंड आहे. ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संघटना आहे.