Tap to Read ➤

बुर्ज खलीफामध्ये एका दिवसात किती पाणी वापरलं जातं?

जगातील सगळ्यात मोठ्या इमारतीमध्ये दिवसाला किती पाणी लागतं हे वाचून अवाक् व्हा.
बुर्ज खलीफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. ज्यात अपार्टमेंट, हॉटेल आणि ऑफिसेस आहेत.
आता इतकी मोठी इमारत म्हटल्यावर दिवसाला पाणीही भरपूर लागत असेल. ते किती लागतं आज आपण जाणून घेऊ.
यूएईमधील ' द नॅशनल' वेबसाईटनुसार, बुर्ज खलीफामध्ये रोज 946,000 लीटर पाण्याचा वापर होतो. यातील 10 हजार लीटर पाणी थंडाव्यासाठी वापरलं जातं.
दुबईमध्ये गरमी जास्त असते. त्यामुळे बिल्डींग थंड ठेवण्यासाठी वेगळी पायपिंग सिस्टीम आहे.
बुर्ज खलीफाच्या टॉप फ्लोरवर पाणी एकत्र पोहोचवता येत नाही. त्यामुळे पाणी मधे मधे टॅंकमध्ये जमा केलं जातं. नंतर थोडं थोडं वर चढवलं जातं.
बुर्ज खलीफाच्या आजूबाजूला 12 लाख एलईडी लाइ्टस आहेत. तसेच जगातील सगळ्यात मोठी एलईडी स्क्रीनही आहे. त्यामुळे विजेचा वापरही खूप होतो.
या इमारतीमध्ये लिफ्ट्स आणि लाखो लाइट्स असल्यानं दिवसाला 36 मिलियन व्हॅट विजेची गरज पडते.
इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असल्यानं वीज बिलही भरपूर येतं. इथे एक वर्षाचं इलेक्ट्रिक बील 300,000 यूरो येतं. म्हणजे 2.65 कोटी रूपये.