Tap to Read ➤
"मी अभिनेत्री, तो राजकारणी"; कसं आहे परिणीतीचं लग्नानंतरचं आयुष्य?
अभिनेत्रीने सांगितलं यशस्वी लग्नामागचं सीक्रेट
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने राजस्थानमधील उदयपूरमध्ये राघव चढ्ढासोबत लग्न केलं.
अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये परिणीती यशस्वी लग्नामागचं सीक्रेट सांगत आहे.
परिणीतीने सांगितले की, "मी अभिनेत्री आहे आणि तो राजकारणी आहे. त्याला बॉलिवूडबद्दल काहीच माहिती नाही."
"मला राजकारणातलं काही कळत नाही. त्यामुळेच आमचं वैवाहिक जीवन खूप चांगलं चाललंय. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत."
परिणीतीचा 'चमकिला' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
याचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. यात दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
परिणीतीचे असंख्य चाहते असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
क्लिक करा