पारिजातक... समुद्रमंथनातून आलेल्या रत्नाची रंजक कथा
धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व असलेल्या पारिजातकाच्या झाडाविषयी...
पारिजातकाच्या झाडाचे महत्त्व अगदी प्राचीन काळापासून आहे. जास्त करुन हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा, इतरत्र नैसर्गिकरित्या उगवणारा हा वृक्ष प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो.
पारिजातकाची फुले अत्यंत नाजूक अन् मोहक असतात. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. याला कोरल जास्मीन, नाईट जास्मीन, ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही म्हणतात.
देव आणि दानवांनी एकत्रितरित्या केलेल्या समुद्रमंथनातून अनेक दिव्य रत्ने बाहेर आली. त्यात अकरावे रत्न बाहेर आले, ते म्हणजे पारिजातकाचे झाड.
देवी सीतेला पारिजाताची फुले अत्यंत प्रिय होती. लक्ष्मी पूजनातही या फुलांचा समावेश प्रामुख्याने केला जातो.
श्रीकृष्णाने इंद्राशी युद्ध करून पारिजातक रत्न मिळवले आणि पृथ्वीवर आणल्याची कथा प्रचलित आहे. रुक्मिणीलाही पारिजातकाची फुले अत्यंत प्रिय होती.
पारिजातकाचे झाड रात्री मनसोक्त फुलते आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच पुष्परुपी सडा जमिनीवर शिंपडते, असे सांगितले जाते.
पारिजातकाचे फूल गणपतीचे आवडते फूल आहे. श्रीकृष्ण, लक्ष्मी, दुर्गा, मल्हारी मार्तंड या देवातांच्या पूजनात या फुलांना विशेष स्थान आहे.
पारिजातकांच्या पानांचे आयुर्वेदात प्रचंड उपयोग नमूद करण्यात आले आहेत. अनेक प्रकारच्या आजारांवर रोगांवर ते अत्यंत गुणकारी, रामबाण मानले जाते.
पारिजातक हा कल्पवृक्षासारखाच एक दैवी वृक्ष आहे. या दैवी वृक्षाला आपल्या संस्कृतीत फार महत्त्व आहे.
देवघरात देवांची गर्दी करू नका, मोजकेच पण 'हे' महत्त्वाचे देव अवश्य ठेवा!