तुमचंही मूल झोपेत बोलतं का? मग अशी दूर करा त्याची समस्या
ही समस्या गंभीर जरी नसली तरी देखील मुलांच्या झोपेची गुणवत्ता बिघडते.
अनेकदा लहान मुलं झोपेमध्ये असतांना बोलतात. ही समस्या गंभीर जरी नसली तरी देखील मुलांच्या झोपेची गुणवत्ता बिघडते. आणि, त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
मुलांची झोपेत बोलायची सवय दूर करण्याचे काही उपाय आहेत. हे उपाय कोणते ते पाहुयात.
झोपेची कमतरता, शालेय अभ्यासाचा ताण, स्क्रीन टाइम किंवा वाईट स्वप्न यांसारख्या कारणांमुळे मुलं झोपेत बोलतात.
मुलं झोपेत बोलत असतील तर त्यांच्या डेली रुटीनकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मुलांच्या झोपेचं वेळापत्रक तयार करा आणि ते जिथे झोपतात तेथील वातावरण शांत ठेवा.
झोपण्याच्या आधी मुलांना टीव्ही, मोबाईल किंवा कॉम्प्युटरपासून दूर ठेवावे.
काही वेळा चुकीच्या आहारामुळे झोपेत अडचणी येतात. झोपण्यापूर्वी मुलांना जड अन्न किंवा गोड पदार्थ देऊ नयेत. यामुळे पचनावर ताण येतो आणि झोपेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
काळी झालेली ऑक्सिडाइज ज्वेलरीची ‘अशा’ पद्धतीने करा स्वच्छ