मुलांमधील संभाषण कौशल्य कसे सुधारावे? 

लहान मुलांमधील संभाषण कौशल्य सुधरवण्यासाठी काही टिप्स 

आपले विचार, भावना व्यक्त करायचा एकमेव मार्ग म्हणजे संभाषण. परंतु, अनेकदा लहान मुलांना बोलतांना काही अडथळे येतात.

लहान मुलांमधील संभाषण कौशल्य सुधरवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या पाहुयात.

घरात संवादाचे वातावरण असणे आवश्यक आहे. मुलं बोलत असतांना त्यांचं बोलणं ऐका. मध्येच त्यांना थांबवून चुका दुरुस्त करु नका. तुम्ही त्यांचं ऐकून घेतल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. 

संवाद करताना त्यांच्या लहानशा गोष्टींचे कौतुक करणेही गरजेचे आहे.

मुलांना जास्तीत जास्त वाचनाची सवय लावावी. गोष्टींची पुस्तके, बालसाहित्य, मासिके यांचा अभ्यास केल्याने त्यांची शब्दसंपदा वाढते. 

जेव्हा शब्दसंपदा समृद्ध असते तेव्हा विचार मांडणे सोपे जाते. त्याचप्रमाणे वाचलेल्या गोष्टींबद्दल मुलांना प्रश्न विचारा.

शाळेतल्या भाषण, वाचन किंवा ग्रुप डिस्कशन यासारख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करा.

लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांना द्या हे ५ सुपरफूड

Click Here