Tap to Read ➤

Pakistan Crisis: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत २६ रुपयांची वाढ करण्यात आलीये. पाहा किंमत..
पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारनं पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या वाढीमुळे किमतींनी नवीन विक्रमी पातळी गाठली आहे.
रोखीच्या भीषण टंचाईचा सामना करणार्‍या पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 330 रुपयांच्या जवळ गेले आहेत.
काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांची मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालयानं शुक्रवारी रात्री पेट्रोलच्या दरात 26.02 रुपये आणि डिझेलच्या दरात 17.34 रुपयांनी वाढ करण्याचा आदेश जारी केला.
यानंतर पेट्रोल आणि 'हाय-स्पीड' डिझेलच्या (एचएसडी) किमती प्रतिलिटर 330 रुपयांपेक्षा जास्त झाल्या आहेत.
यापूर्वी १ सप्टेंबरलाही काळजीवाहू सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १४ रुपयांची वाढ केली होती.
शेजारील देशात पंधरवड्यात या पेट्रोलियम प्रोडक्ट्सच्या किमती दोनदा वाढल्यानं तेथील लोकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे.
सर्व खाजगी आणि सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये पेट्रोल आणि एचएसडीचा वापर केला जातो.
क्लिक करा