पाकच्या छोरीची कमाल! कमी वयात नावे झाला कॅप्टन्सीचा खास रेकॉर्ड
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत असा पराक्रम करणारी ती दुसरी कॅप्टन ठरलीये
पाकिस्तानच्या महिला संघाने महिला टी-२० वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. यात संघाची कॅप्टन फातिमा सना हिने मोलाचा वाटा उचलला.
या विजयासह फातिमा सनाच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे. महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना जिंकणारी ती दुसरी युवा कॅप्टन ठरलीये.
२२ वर्षे ३३० दिवस वय असताना तिने पाकिस्तान संघाला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना संघ अडचणीत सापडल्यावर तिने २० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० बहुमूल्य खेळी केली.
बॉलिंग वेळीही तिने आपला जलवा दाखवला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात २.५ षटकात तिने फक्त १० धावा खर्च करत २ विकेट्सही घेतल्या.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अष्टैपलू कामगिरी करुन संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल फातिमा सनाला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
महिला टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात कमी वयात कॅप्टन्सी करताना संघाला पहिला सामना जिंकून देण्याचा विक्रम मेग लेनिंगच्या नावे आहे. तिने २१ वर्षे ३६३ दिवस वय असताना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील युवा कॅप्टन्सीच्या खास क्लबमध्ये आता फातिमा सनाही सामील झाली आहे.