Tap to Read ➤
भारतातील 'असं' राज्य; जिथं आहे केवळ १ रेल्वे स्टेशन
देशात रेल्वेचे खूप मोठे नेटवर्क असून रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात
देशातील सर्वसामान्यांची लाईफलाईन ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेने अनेक राज्य आणि शहरांना जोडले आहे.
प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात एकतरी रेल्वे स्टेशन असते, काही ठिकाणी एकाहून अधिक रेल्वे स्टेशन्स असतात.
परंतु तुम्ही कधी ऐकलंय? भारतात असेही एक राज्य आहे ज्याठिकाणी केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे.
भारतात असे एक राज्य आहे जिथे एकच रेल्वे स्टेशन आहे. या राज्याचे नाव आहे मिझोराम.
मिझोराम हे भारतातील एकमेव असे राज्य आहे जिथं 'बहरबी' नावाचे एकमेव रेल्वे स्टेशन आहे.
राज्यात दुसरे रेल्वे स्थानक नसल्यामुळे ज्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे ते या रेल्वे स्थानकावर पोहोचतात.
या रेल्वे स्टेशनच्या पुढे कुठलेही स्टेशन अथवा रेल्वे रुळही नाही. बहरबी स्टेशनवर सुविधेची कमतरता आहे.
या रेल्वे स्टेशनवर ३ प्लॅटफॉर्म आहेत. त्याशिवाय ४ रेल्वे रुळ आहेत. २०१६ मध्ये हे रेल्वे स्टेशन विकसित करण्यात आले.
११ लाख लोकसंख्येच्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन असल्याने येथील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
क्लिक करा