Tap to Read ➤

एका मोबाईल नंबरवर किती Aadhaar Card लिंक करता येतात? जाणून घ्या

आधार हे सध्या महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक कामांसाठी आधारचा वापर केला जातो.
मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला प्रत्येक बदलासाठी आधार केंद्राकडे जावं लागेल.
अशा स्थितीत प्रश्न पडतो की, कोणाच्या घरी एकच मोबाइल असेल तर त्यानं काय करावं? याचं उत्तरही आधार बनवणाऱ्या UIDAI या संस्थेकडे आहे.
युएआयडीआयच्या म्हणण्यानुसार तुम्ही एका मोबाईल क्रमांकाशी कितीही आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा किंवा बंधन नाही.
जर तुमचं आधार तुमच्या मोबाईलशी लिंक नसेल तर करुन घ्या. फोन नंबर आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावं लागेल.
येथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरा आणि सबमिट करा. यासोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रं जोडावी लागतील.
मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावं लागेल. कागदपत्रे आणि शुल्क जमा केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट घेतली जाईल.
काही दिवसांनी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला जाईल. यानंतर तुम्ही अनेक कामं घरबसल्या करू शकता.
क्लिक करा