₹२७ चा होता शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "२००० च्या पुढे जाणार..."
EV तयार करते कंपनी, जाणून घ्या...
Olectra Greentech share price: इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्समध्ये मंगळवारी फोकसमध्ये होते. ब्रोकरेज फर्म आनंद राठी ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्सवर सकारात्मक असून त्यावर 'बाय' रेटिंग आहे.
आनंद राठी यांच्या म्हणण्यानुसार, एका महिन्यात हा शेअर १२ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. टेक्निकल अॅनालिस्टच्या आधारे ब्रोकिंग फर्मने ओलेट्रा ग्रीनटेकच्या शेअर्सची निवड केली आहे.
आज इंट्राडेमध्ये कंपनीचा शेअर १,७८७.९५ रुपयांवर व्यवहार करत होता. गुंतवणूकदारांनी १७८५-१८१५ रुपयांच्या रेजमध्ये मोठी पोझिशन घेण्यावर विचार करावा, असं ब्रोकरेजनं म्टलं.
तसंच याचं टार्गेट प्राईज २०२० रुपये निश्चित करण्यात आलं असून स्टॉप लॉस १६९० ठेवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
ओलेक्ट्रा ग्रीनटेक ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे उत्पादन केंद्र हैदराबाद येथे आहे.
ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी आहे ज्याने भारतात सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक बसचे उत्पादन केलं आहे. (टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)