हिटमॅन रोहितला वर्ल्ड रेकॉर्डची संधी ; इथं पहा वनडेतील ६ सिक्सर किंग
एक नजर वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ६ फलंदाजांवर
रोहित शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ७ षटकार ठोकत गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर आहे.
इथं एक नजर टाकुयात वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी वनडेत सर्वाधिक षटकार माऱणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वात आघाडीवर आहे. त्याने १९९६ ते २०१५ पर्यंतच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ३९८ सामन्यात ३५१ षटकार मारले आहेत.
रोहित शर्मानं २००७ मध्ये वनडे पदार्पण केल्यापासून आतापर्यंत २६७ सामन्यातील २५९ डावात ३३८ षटकार मारले आहेत.
ख्रिस गेल याने १९९९ ते २०१९ या कारकिर्दीत ३०१ सामन्यातील २९४ डावात ३३१ षटकार मारले आहेत.
श्रीलंकेचा सनथ जयसूर्या या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. १९८९ ते २०११ या कारकिर्दीत त्याने ४४५ सामन्यातील २३३ डावात २७० षटकार मारले आहेत.
महेंद्रसिंह धोनी या यादीत टॉप ५ मध्ये आहे. २००४ ते २०१९ या कालावधीत धोनीने ३५० सामन्यातील २९७ डावात २२९ षकार मारले आहेत.
इंग्लंडच्या इयॉन मॉर्गन याने २००६ ते २०२२ या कारकिर्दीत २४८ सामन्यातील २३० डावात २२० षटकार मारले आहेत. वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.